महाराष्ट्र
देशाच्या उज्वल भविष्यासाठी एक मदतीचा हात म्हणून ज्येष्ठ समाजसेवक श्री संजय चव्हाण यांनी श्री संत घाडगेनाथ हायस्कूल मुक्काम पोस्ट कोळे येथील शाळेच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांना होणाऱ्या चिखलाचा त्रास लक्षात घेता शाळेच्या प्रांगणामध्ये मुरूम टाकून जपली सामाजिक बांधिलकी
मुक्काम पोस्ट कोळे, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील श्री संत घाडगेनाथ हायस्कूलच्या प्रांगणामध्ये मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे नेहमी चिखल होत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन समाजसेवक श्री संजय चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळेतील मुलांसाठी मदतीचा हात म्हणून शाळेच्या प्रांगणामध्ये मुरूम टाकून मुलांसाठी शाळेचे प्रांगण यथायोग्य केले.अध्यापनाबरोबर सर्वांगीण विकासासाठी शाळेचे प्रांगण नेहमीच पूरक ठरले आहे, आजचे विद्यार्थी देशाचे उज्वल भविष्य असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या प्रांगणाचे विशेष महत्त्व आहे असे यावेळी ते म्हणाले.श्री चव्हाण यांच्या कामाची पोचपावती म्हणून संत घाडगेनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी छोटेखानी सत्कार आयोजित करून मान्यवरांच्या उपस्थित चव्हाण यांचा सत्कार केला.ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 क्राइम टाइम्स मुख्य संपादक श्री उत्तम देसाई.
