Breaking
ब्रेकिंग

युवकांनो सावधान व्यसनी विनाशाकडे नेत आहेत.

महाराष्ट्र अमली पदार्थ विक्री अधिनियम कायदा अन्वये व महाराष्ट्रामध्ये अमली पदार्थ, उदाहरणार्थ चरस, गांजा ,आदींच्या व्यवसायातून विक्री करणे बेकायदेशीर असून कडक निर्बंध असताना सातारा शहरांमध्ये काही समाजकंटक बिनधास्तपणे गांजा व अमली पदार्थाची विक्री राजरोसपणे करून युवकांना व समाजातील इतर लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांना वचक बसवण्यासाठी या कायद्याअंतर्गत असणाऱ्या शिक्षेच्या तरतुदी अंतर्गत कायदेशीर व दंडात्मक कारवाई करून सदरचे बेकायदेशीर अवैध धंदे करणाऱ्या लोकल वरती वरदहस्त कोणाचा हा जनसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आह अमली पदार्थ विक्री हा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक आहे.तसेच दिशाहीन अमली पदार्थाची कीड लागलेल्या समाज हा सर्वात कमजोर समाज असतो.त्याला हवं तसं हाकरता येते. खरंतर नशाबाजी केवळ रेव पार्टीमध्ये श्रीमंत वर्गामध्ये चालते वगैरे संकल्पनेला तिलांजली मिळत चालली आहे, सामान्य मध्यमवर्गीय घरातील मुले देखील या नशेच्या आहारी गेलेली दिसत आहेत. तसं बघितलं तर सातारा ही भूमी जवानांची भूमी ही सातारा शहराची खरी ओळख? परंतु सध्याची परिस्थिती पाहता तरुण वर्ग या अमली पदार्थांच्या सेवनाने आपल्या स्वतःच्या आरोग्याशी खेळत आहे विशेष म्हणजे कायदा व सुव्यवस्था एवढा कडक असताना राजरसपणे शहरांमध्ये गांजा या अमली पदार्थाची विक्री होताना दिसत आहे गल्लोगल्ली मध्ये गांजाची पाकिटे विकत घेताना युवक वर्ग दिसत आहेत.अगदी तोळ्याच्या भावामध्ये गांजा विक्री होते आहे.या विक्री व्यवस्थेला जबाबदार कोण हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये व या नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या कुटुंबांच्या मनामध्ये घर करत आहे, तसेच या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे संघटित गुन्हेगारीचे बीज देखील वाढत आहे या सर्व बेकादेशीर विक्री व्यवस्थेला वरदहस्त कोणाचा याची खरी व्याख्या कोणी करायची? आमच्यासारख्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला काम करणाऱ्या पत्रकारांना सतावत आहे याची जनजागृती केली तर कुणाच्या अंगावर शिंतोडे उडणार? हे पत्रकार म्हणून जाणत आहे म्हणून हे सर्व बेकादेशीर धंदे चालवण्यासाठी वरदहस्त म्हणजेच पोलीस प्रशासन प्रणाली? हे उत्तर मिळाल्याशिवाय राहत नाही खाकी वर्दीतला माणूस देखील माणूस असतो त्याला देखील घर परिवार असतो थोड्याशा वरच्या मलई साठी हे बेकायदेशीर धंदे चालू ठेवणे कितपत योग्य आहे? याची किमान शहानिशा करून सदरचे सातारा शहरातील हे सर्व तथाकथित खाकी वर्दीतील संरक्षणामध्ये चालवले जाणारे अवैध धंदे ताबडतोब बंद करून समाजाला सातारा शहरातील पोलीस यंत्रणेने योग्य ते दिशा निर्देश देऊन कायमस्वरूपी बंद करून उपकृत केले पाहिजे अन्यथा जनमत आवाज पत्रकार असोसिएशन च्या माध्यमातून मोठे जनजागृती आंदोलन छेडले जाईल याची नोंद सातारा शहरातील पोलीस यंत्रणेने घ्यावी व अल्टिमेटम दिलेल्या तारखेच्या अगोदर हे सर्व तथाकथित गोरख धंदे बंद नाही झाले तर पुराव्यानिशी शासन दरबारी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, आंदोलने या मार्गांचा वापर करून दाद मागितली जाईल व या विक्री व्यवस्थेला हातभार लावणाऱ्या शासकीय खाकी वर्दीतील समाज कंटकांची गय केली जाणार नाही याची नोंद घेऊन सातारा शहराच्या उज्वल भविष्यासाठी आपण व आपल्या पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकारी वर्गाने हातभार लावून सातारा शहराला उपकृत करावे ही नम्र विनंती न्यूज 18 क्राईम टाइम्स न्यूज तसेच जनमत आवाज पत्रकार असोसिएशनच्या माध्यमातून करत आहोत तसेच दोषी आढळणाऱ्या शासकीय खाकी वर्दीतील समाजकंटकांच्या विरुद्ध सन्माननीय न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी सहकार्याच्या अपेक्षसह धन्यवाद आपला कृपा अभिलाषी. महोदय हे सर्व करत असताना तथाकथित समाजकंटक आणि त्यांचे पालनपोषण करणारे खाकी वर्दीतील त्यांच्यासाठी असणारे देवदूत यांनाच सप्राग बसल्याशिवाय राहणार नाही.

0 0 1 3 8 0
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 3 8 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे