ब्रेकिंग
*शीना बोरा हत्याकांडाला वेगळे वळण?, आधी आईवरच हत्येचा होता आरोप, सीबीआय म्हणाली ‘ती’ हाडे…*
शीना बोरा हत्याकांडाला वेगळे वळण लागले आहे. शीना बोरा हत्याकांडात इंद्राणी मुखर्जी आरोपी आहेत. इंद्राणी मुखर्जी भायखळाच्या महिला कारागृहात होत्या. इंद्राणी मुखर्जी यांनी शीना बोरा हीची आपल्या ड्रायव्हरच्या मदतीने हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सरकारी वकीलांनी इंद्राणी मुखर्जी हीचे हाडे गायब झाल्याचा आरोप केला होता. परंतू सीबीआयने म्हटलेय की शीना बोरा हीची हाडे आमच्या ताब्यात असल्याचे म्हटले आहे…. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे 12 वर्षांपूर्वीच्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणाची बुधवारी सुनावणी सुरु झाली आहे. यावेळी फोरेन्सिक तज्ज्ञ डॉ.झेबा खान कोर्टात उपस्थित होत्या. साल 2012 रोजी इंद्राणी मुखर्जी यांनी त्यांची मुलगी शीना बोरा हीची साथीदाराच्या मदतीने हत्या केली होती. शीना बोरा हत्याकांडाने 12 वर्षांपूर्वी खळबळ उडाली होती. या हत्याकांडात मिडिया हाऊसचे प्रमुख पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हीने आपल्याच मुलीला कारमध्ये साथीदारांच्या मदतीने गळा दाबून ठार केले होते. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करुन पेण येथील जंगलात तिच्या शरीराचे अवशेष पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रयत्न केला होता. या नंतर पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांचे संबंध बिघडले होते असे तपासात उघडकीस आले होते. या प्रकरणात गेल्या सुनावणी वेळी सरकारी वकीलांनी शीरा बोरा हीचे हाडे गायब असल्याचे म्हटले होते. ही हाडे कोर्टात सादर करावीत असे त्यांनी म्हटले होते.
