Breaking
ब्रेकिंग

*बहुजन समाज पक्षाचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.ऍड.श्री.सुनिलजी डोंगरे यांचा बसपा भवन,चेंबूर, मुंबई येथे स्वागत व सत्कार समारंभ संपन्न.*

बहुजन समाज पक्षाचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.ऍड.श्री.सुनिलजी डोंगरे यांचा बसपा भवन,चेंबूर, मुंबई येथे स्वागत व सत्कार समारंभ संपन्न. *शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी रात्री 08 वाजता बसपा भवन मुंबई येथे मा.श्री.सुनिलजी डोंगरे यांचा स्वागत व सत्कार समारंभ मुंबईतील कार्यकर्त्यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणात फटाक्यांची आताशबाजी केली .* *या कार्यक्रमास उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी श्री.डोंगरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.* *या कार्यक्रमासाठी मुंबई तील प्रमुख आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते* *यावेळी बोलताना सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी तन मन धनाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे श्री.डोंगरे यांनी अभिनंदन केले.* *श्री.डोंगरे यांनी मागील झालेल्या चुका कार्यकर्त्यांनी सुधारून आपआपसात असलेले मतभेद दूर करून येणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वतीने एकतरी आमदार निवडून आणण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.* *बसपा देशात व राज्यात परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय समन्वयक व युवानेते मा.श्री. आकाशजी आनंद यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात जबाबदार प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास येईल अशी खात्री श्री.डोंगरे यांनी कार्यकर्त्यांना दिली.*

0 0 1 3 7 7
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 3 7 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे