Breaking
कृषीवार्तामहाराष्ट्र

तालुका दौंड या ठिकाणी आईच झाड या संकल्पनेतून वृक्षप्रेमी मित्रांनी केले दीडशे झाडांच्या वृक्षारोपण

आईचं झाड या संकल्पनेतून आईचं बंन वाखारी तालुका दौंड या ठिकाणी 150 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, या संकल्पनेत महाराष्ट्रातून वृक्षप्रेमींनी सहभाग घेतला होता, प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड व एक ट्री गार्ड एक मित्र एक वृक्ष या ग्रुपला वृक्षारोपणासाठी दिले होते, या वृक्षारोपणामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुलिंब, पिंपरण, पळस, अर्जुन, भोकर, बेल, आपटा, चेरी, शिरीष, करंज, सिसम, या प्रकारचे देशी वृक्ष लावण्यात आले. आज नांदूर येथील फ्लीटगार्ड फिल्टर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वृक्षारोपणासाठी ग्रुपला 125 झाडे दिली, वृक्षारोपणासाठी कंपनीचे एम्प्लॉईज आले होते त्यांनी सुद्धा वृक्षारोपणामध्ये सहभाग घेतला होता, कंपनीने केलेल्या मदतीसाठी एक मित्र एक वृक्ष ग्रुप कडून कंपनीचे एम.डी साहेब, HR मॅनेजर प्रियंका चव्हाण मॅडम व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार. भविष्यातही आपल्याकडून पर्यावरण वाचण्यासाठी मोठ्या मदत मिळावी ही विनंती. डॉक्टर्स डे निमित्त दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील डॉक्टर असोसिएशने वृक्षारोपणासाठी झाडे दिली होती त्याचे सुद्धा रोपण आज करण्यात आले, पर्यावरणाची गरज ओळखता डॉक्टरांनी वृक्षारोपणाच्या या कार्यात आर्थिक मदत केली व सहभाग घेतला त्याबद्दल असो. अध्यक्ष डॉ. खेडेकर साहेब व सहभागी सर्व डॉक्टर्स यांच्या आभार, वृक्षारोपणासाठी एक मित्र एक वृक्ष या ग्रुपचे सदस्य त्याच्याबरोबर बी बी खळदकर फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी, केडगाव येथील आंबेगाव पुनर्वसन येथील स्वामी विवेकानंद विद्यालय यांचे विद्यार्थी व मुख्याध्यापिका जाधव मॅडम व शिक्षक उपस्थित होते. यांचे सुद्धा मनःपूर्वक आभार व धन्यवाद, वृक्षारोपणाबरोबर वृक्ष संवर्धनासाठी सुद्धा मुलांचा सहभाग भविष्यात राहील असे यावे त्यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रुपचे संचालक डॉक्टर श्रीवल्लभ अवचट, लहू धायगुडे, दादा बोडरे, डॉ निलेश लोणकर, डॉ. शंकर चव्हाण, डॉ. श्रीकांत ढाकुलकर उपस्थित होते...

0 0 1 3 7 7

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 3 7 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे