Breaking
संपादकीय

भुशी डॅम मधील काही दिवसापूर्वी घडलेल्या घटनेचा बोध घ्या आपला जीव अनमोल आहे निसर्गाचा मनमुराद आनंद लुटा पण सावधानतेने.

पावसाळा सुरु झालाय.. सगळीकडे हिरवंगार झालय.. पिकनीक प्लॅन होत आहेत पण पावसाळ्याच्या सुरुवातीला दगड माती पाण्यासोबत वाहून येते त्यामुळे त्या जमीनीला सेट होवु त्यात होतं , आपणा सर्वांनाच कधी एकदा पाऊस येतो आणि मी भिजायला जातो असं होतं जवळपास संपूर्ण पावसाळा भिजून देखील समाधान होत नाही.. सर्वांचेच धबधब्यत भिजायचे प्लॅन सुरु झाले आहेत .. रील्स करताना , सेल्फी घेताना स्वतःची काळजी घ्या.. पुढील अनेक पावसाळे आपल्याला मज्जा घ्यायची आहे आणि घरी आपली कोणीतरी वाट पहात असतं या सगळ्याचा विचार करुन निसर्गाची मज्जा घ्या.. काही लोकांचे रील्स पाहिले की भिती वाटते.. आपली कला दाखवायला आणि बिझनेससाठी रील्स हे उत्तम माध्यम आहे त्यामुळे ते त्यासाठीच आणि गरजेपुरते जरूर वापरा.. नवनवीन टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता यायलाच हव्यात पण त्याचा अतिरेक नको..तरुण जनरेशन तर यात वहावत जाताना दिसते आणि अनेक अपघात होतात.. निसर्गात जाऊन व्यसनं करणं असेल , तिथे जाऊन काचेच्या बाटल्या फोडणे असेल .. त्या काचा प्राण्यांना लागतात.. ते जखमी होतात याला जबाबदार आपण होतो.. कृपा करून असं कुठलही वाईट कृत्य आपल्या हातून न घडता निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करत आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे.. कर्म आपली पाठ कधीही सोडत नाहीत याची दोन उदाहरणे म्हणजे भीष्म पितामह आणि धृतराष्ट्र ..आपण कोणीही कुठल्याही पदावर असलो.. नावाला कितीही वलय असलं किवा कितीही पैसा असला तरीही आपली कशातुनही सुटका नाही.. कशाचा माज आणि गर्व न करता मुक्तपणे आपल्याला आनंद घेता यायला हवा.. ताह्मीनी घाट , मढे घाट , वरंध घाट ,लोणावळा अशी अनेक सुंदर ठिकाणे आणि तिथे असणारे धबधबे आपली वाट पहात आहेत पण जेव्हा आपल्याला जाणवेल की या सीमेच्या पलीकडे आपल्याला जायचे नाही तिथे लगेच थांबता यायला आपल्या प्रत्येक कृतीवर आणि इंद्रीयांवर आपला ताबा असायला हवा.. सतत भगवंताचे नामस्मरण करत राहिलो की ही ताकद आपल्याला आपोआप येते.. निसर्गाच्या विरूध्द जाऊन आपण मस्ती केली की तो दणका देणारच शेवटी लेकराला शिक्षा दिल्याशिवाय ते सुधारणार नाही हे बापापेक्षा चांगलं कोणीही जाणू शकत नाही.. निसर्ग आपला आहे.. प्रत्येक गोष्ट आपली आहे असं समजून ती जपून वापरली तर आपण वाईट कृत्य करणारच नाहीत... क्षणोक्षणी , पदोपदी, पावलोपावली कृतज्ञता व्यक्त करायला विसरु नका.

0 0 1 3 7 7

5/5 - (1 vote)

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 3 7 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे