ब्रेकिंग
पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी श्री मंगेश चितळे.
पनवेल: कल्याण डोंबिवलीच्या अतिरिक्त पदावरती कार्यरत असणारे श्री मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पनवेल नगर परिषदेचे पनवेल महानगरपालिकेमध्ये मध्ये रूपांतर करण्यामध्ये श्री मंगेश चितळे यांचे मोठे योगदान राहिले आहे.यावेळी त्यांनी पाणी प्रश्न रस्ते कॉंक्रिटीकरण, उद्यानाचे सुषभीकरण करून पनवेल स्वच्छ व सुंदर करण्यावरती त्यांचा भर दिला होता.पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर काही काळ उपायुक्त म्हणून त्यांनी या ठिकाणी काम पाहिले आहे.त्यानंतर बारामती येथे मुख्याधिकारी, नगर विकास विभाग पुणे पालिकेमध्ये उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.महानगरपालिका क्षेत्रामधील नागरी सुविधा अंतर्गत 29 गावांमधील अंतर्गत विकास कामे स्वच्छता अभियान, पनवेल शहरातील पाणीपुरवठा योजना,अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेली झोपडपट्टीधारकांची पुनर्वसन योजना.सिडको कडून महानगरपालिका होणारे सामाजिक, शैक्षणिक व्यावसायिक भूखंडाचे हस्तांतरण,पनवेल महानगरपालिकेचे स्वराज्य मुख्यालयाचे काम, इ सेवा सुविधा सुरू करण्यास प्राधान्य असणार आहे.आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मान्सूनपूर्व सुरू असलेल्या कामाचा आढावा यावेळी आयुक्तांनी घेतला.यामध्ये पाणी तुंबणारी ठिकाणे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने ट्रांजिस्ट कॅम्प ची तयारी संभाव्य धोखे ओळखून दक्षता घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना या अनुषंगाने येणाऱ्या विविध कामाचा आढावा यावेळी आयुक्तांनी घेतला.दिव्यांग विभाग, समाज कल्याण विभागातील विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आराखडा बनवण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागास यावेळी दिल्या.महानगरपालिकेचा विकास करताना सर्वांनी मिळून वेगाने कामे करावी अशा सूचना आयुक्त आणि सर्व विभाग प्रमुखांना दिल्या.
