Breaking
ब्रेकिंग

बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे उदाहरण ताजे असतानाच पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील भोसगाव या गावातील नाभिक समाजातील हिंदू अल्पवयीन मुलीवर मुस्लिम समाजातील मुलाने केला लैंगिक अत्याचार.

महाराष्ट्र मध्ये महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नाव काही दिसत नाही.नुकत्याच बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या आत्याचाराचे उदाहरण ताजे असतानाच पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील भोसगाव या गावातील हिंदू नाभिक समाजातील अल्पवयीन मुलीवर मुस्लिम कुटुंबातील एका मुलाने लैंगिक अत्याचार करून मुलीच्या कुटुंबाला जिवे मारून ठार करण्याची धमकी दिली,या अनुषंगाने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी ढेबेवाडी येथील स्वाभिमानी नाभिक संघटना व सकल हिंदू समाज यांच्यावतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.भगव्या टोप्या परिधान करून बहुसंख्य नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या अनुषंगाने शासनाला एक निवेदन देखील देण्यात आले.निवेदनामध्ये लैंगिक अत्याचाराने पीडित मुलीला व मुलीच्या कुटुंबीयांना पोलीस प्रोटेक्शन मिळावे तसेच आर्थिक मदत करून येणाऱ्या काळात शासनाने जाग होऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्याला कडक शासन करून विधानसभेच्या अगोदर एक तातडीचे अधिवेशन घेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा व धर्मांतर कायदा कडक करण्यात यावा.तसेच यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना सूचना वजा आव्हान करण्यात आले की हिंदू समाजाचा अंत बघू नका.इथून पुढच्या काळात हिंदू समाजाच्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला तर जशास तसे उत्तर देण्यात येईल आणि यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्थता विस्कळीत झाली तर याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन आणि शासन असेल.आणि सादर केलेल्या निवेदनातील अटी व शर्तींचे सात दिवसाच्या आत पालन झाले नाही तर सातारा जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि याला देखील सर्व जबाबदार शासन असेल.म्हणून या सर्व प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी योग्य तो निर्णय घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात यावा.याचवेळी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय इत्यादी घोषणा देऊन पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.या मोर्चामध्ये हभप अनिल देवळेकर महाराज तसेच कट्टर हिंदुत्ववादि शंभू चरित्रकार शंकरराव गायकवाड साहेब, तसेच स्वाभिमानी नाभिक संघटना सातारा जिल्हाध्यक्ष माननीय अधिकराव चव्हाण व सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. मुख्य संपादक न्यूज 18 क्राईम टाइम्स वक्तवाहिनी.

0 0 1 8 1 7

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे