Breaking
महाराष्ट्र

सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथे शिक्षकांबद्दल आदरभाव प्रेमभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन केला मोठ्या उत्साहात साजरा.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो.दिवंगत डॉक्टर राधाकृष्णन यांनी महान शिक्षण तज्ञ,तत्त्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती अशी महत्त्वाची पद भूषवून त्या पदांना त्यांनी आपल्या कृतीमधून सन्मान देखील मिळवून दिला.त्यांचे शिक्षण क्षेत्रात असणारे अमूल्य योगदान म्हणजे भारतीय व्यक्तीची जीवनातील वैश्विक शाळा म्हटलं तरी वावग ठरणार नाही? म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून ओळखला जातो.आई-वडिला नंतर शिक्षक हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती असते.शिक्षक आपल्याला आचार आणि विचार यामधील दिशा दाखवतात.कारण ज्योत पेटवण्यासाठी समई मध्ये हवी वात! चांदणे पाण्यासाठी आकाशात हवी रात्र! आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ!अशाप्रकारे ज्ञानाचा दिवा पेटवणाऱ्या शिक्षकांबद्दल आदरभाव प्रेमभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतामध्ये शिक्षक दिन आनंदाने साजरा करतात.अशाच प्रकारे सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथे देखील शिक्षक दिन मोठ्या प्रेम पूर्ण भावाने डॉक्टर एम डी पाटील सभागृह येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माझी इंग्रजी विभाग प्रमुख सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजचे माननीय सुमंत जगताप सर उपस्थित होते.तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने यांनी भूषवले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर कोमल कुंदप तथा प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर अभय पाटील यांनी केला.विद्यार्थी मनोगत कुमारी तनवी धोत्रे आणि कुमारी शिवानी पवार यांनी व्यक्त केले.महाविद्यालयीन शिक्षक व सेवकांचा सत्कार माननीय प्राचार्य व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.आभार प्रदर्शन माननीय विकास गायकवाड सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मुख्य संपादक श्री उत्तम देसाई न्यूज 18 क्राईम टाइम्स वृत्तवाहिनी.

0 0 1 8 1 6

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे