Breaking
ब्रेकिंग

सत्यशील दादा शेरकर यांनी जुन्नर तालुक्यात गेले १० दिवस विविध गणपती मंडळांना भेट देत गणरायाच्या भक्तीने तल्लीन झालेले मन आज बाप्पाचा निरोप घेताना भरून आले असे भावपूर्ण उद्गार सत्यशील दादा यांनी काढले, परंतु हे गणपती विसर्जन एक वियोग नसून एक नवा आरंभ आहे.

सत्यशील दादा शेरकर यांनी जुन्नर तालुक्यात गेले १० दिवस विविध गणपती मंडळांना भेट देत गणरायाच्या भक्तीने तल्लीन झालेले मन आज बाप्पाचा निरोप घेताना भरून आले असे भावपूर्ण उद्गार सत्यशील दादा यांनी काढले, परंतु हे गणपती विसर्जन एक वियोग नसून एक नवा आरंभ आहे. बाप्पाची कृपा सदैव तालुक्यातील शेतकरी बंधू भगिनींवर राहील,याच विश्वासाने पुढच्या वर्षी नव्या उत्साहात, नव्या जोशात बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज राहू असे प्रतिपादन सत्यशील दादांनी यावेळी केले तसेच जुन्नर तालुक्यातील विविध गणेश मंडळाच्या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत देखील सहभागी होऊन मंडळातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बालमित्र गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत देखील सहभागी होऊन सत्यशील दाद्या शेरकर यांच्यासहित भक्तांनी जड अंत:करणाने बाप्पाला निरोप दिला. आज श्री गणरायांचे विसर्जन करताना सर्वांच्या सुखी, समृद्धी आणि आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना सत्यशील दादा शेरकर यांनी करून सर्वांना विवेक बुद्धी दे सर्वांना सुखी ठेव आणि हे देवा गणराया तुझी सेवा करण्याची प्रत्येक वर्षी संधी दे असे मागणे मागून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत सर्व गणेश भक्तांनी साश्रू पूर्ण नयनांनी गणपती बाप्पाचे विसर्जन करून निरोप घेतला.यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, बाबूभाऊ पाटे, संतोष वाजगे, सुरज वाजगे, शेखर ढवळे, सरपंच शुभदाताई वाव्हळ, गणेश कवडे, गणेश पाटे, दिपक आहेर, वैभव आहेर, समवेत आलेले सहकारी, गणेश भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज 18 क्राईम टाइम्स जुन्नर.

0 0 1 8 1 7

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे