Breaking
ब्रेकिंग

नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत मध्ये दोन कोटींचा अपहार माजी सरपंच आणि ग्रामसेवकावर ठपका.

" नगर जिल्ह्यात ग्रामपंचायतीत २ कोटींचा अपहार… माजी सरपंच, ग्रामसेवकावर ठपका… नगर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीत १ कोटी ९४ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशी अहवालात समोर आले आहे. यासंदर्भात यापूर्वीच दोन ग्रामसेवकांवर निलंबन कारवाई झाली आहे. तसेच तत्कालीन सरपंचावरील कारवाईसाठी अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. तत्कालीन सरपंच महेंद्र साळवी व ग्रामसेवक राजेश तगरे यांच्या कार्यकाळातील चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्य अभिषेक खंडागळे, मुश्ताक शेख, चंद्रकांत नवले, उज्ज्वला कुताळ यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य़कारी अधिकारी यांनी चौकशी समिती नियुक्त करून ग्रामपंचायतची १ एप्रिल २०२२ ते ११ नोव्हेंबर २०२३ या कालावधीतील दफ्तराची चौकशी केली. प्रमाणकाशिवाय ग्रामनिधीमधून २६ लाख ९९ हजार ७१४ रुपये काढले, जीईएम पोर्टलद्वारे साहित्य खरेदी न करता ८९ लाख २२ हजार ९११ रुपये खर्च, १५ व्या वित्त आयोगांतर्गत २०२१-२२ व २०२२-२३ मधील एकत्रित काम पाण्याची टाकी बांधकाम करणे (७३ लाख ६३ हजार ४६४ रुपये) या कामाची ई निविदा प्रक्रियेबाबत वापरलेली कागदपत्रे तपासास उपलब्ध करून न दिल्याने ऑनलाईन तपासणी करता आली नाही. विकासकामांवर ७० लाख २७ हजार ३५७ रुपये खर्च, पैकी २३ लाख ३१ हजार ६५८ रुपये या शासकीय रकमेची साहित्य व विकासकामे न करता रक्कम परस्पर तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाने संगनमताने कायम काढून घेतली. उर्वरित ४६ लाख ९५ हजार ६९९ रक्कमेच्या कामाची अंदाजपत्रके निविदा व मूल्यांकने, कामाची ठिकाणे तपासणी कामी उपलब्ध न झाल्याने ही रक्कम संशयित आहे.

0 0 1 3 8 0

5/5 - (1 vote)

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 3 8 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे