Breaking
ब्रेकिंग

सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी 732 कोटी 29 लाख 23 हजार रुपयांच्या प्रारूप आराखड्यास पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आली मान्यता.

सातारा जिल्ह्याचा ७३२ कोटींचा आराखडा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी २०२४- २५ च्या ७३२ कोटी २९ लाख २३ हजार रुपयांच्या प्रारूप आराखड्यास पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवनात श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, अरुण लाड, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सन २०२४-२५ साठी जिल्हा वार्षिक योजनेचा ७३२ कोटी २९ लाख २३ हजार रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी ६२१ कोटी ८१ लाख रुपयांचा आराखडा केला असून, यामध्ये १८५ कोटी ८१ लाख रुपयांची वाढीव मागणी समाविष्ट आहे. अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी १०८ कोटी ८४ लाख ६५ हजार रुपयांचा आराखडा केला आहे. आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रमासाठी एक कोटी ६३ लाख ५८ हजार रुपयांचा आराखडा आहे. सातारा जिल्हा बॅंकेची सामान्य कर्ज मर्यादा वाढणार जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत ५४२ कोटी ६३ लाख ५८ हजार रुपयांची अर्थ संकल्पित तरतूद आहे. यापैकी ३७२ कोटी ८ लाख बीडीएसवर प्राप्त आहेत. ३७२ कोटी ८९ लाखांहून अधिक रकमेच्या विकासकामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. बैठकीत झालेले निर्णय...  सौर कुंपण योजनेचा प्रस्ताव संपूर्ण जिल्ह्यासाठी तयार करावा.  वन्य प्राण्यांकडून झालेल्या शेती नुकसानीची भरपाई वाढविण्यासाठी प्रयत्न.  संगम माहुली येथील विकासकामांचे प्रस्तावाच्या सादरीकरणाच्या सूचना.  म्हासुर्णे येथील श्री भैरवनाथ देवस्थानाच्या प्रस्तावास मान्यता.  अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी १०८ कोटी ८४ लाख ६५ हजार रुपयांचा आराखडा केला आहे.

0 0 1 3 7 9
5/5 - (1 vote)

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 3 7 9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे