Breaking
ब्रेकिंग

सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुक्काम पोस्ट तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथून माऊलींच्या पालखीचे मोठ्या आनंदोत्सवात प्रस्थान.

सुख लागे करीशी तळमळ!परी तू पंढरीसी जारे एक वेळ! तेथे तू अवघाचा सुखरूप होशी! जन्मोजन्मीचे दुःख विसरूनी! हे जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबारायांनी उगीच म्हटले नाही.आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रातील संत सज्जनांचा आनंद उत्सव, या आनंद उत्सवात महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील आबाल वृद्ध अगदी विठू माऊलीच्या भेटीसाठी नादब्रह्म करून टाळ मृदुंगाचा गजरामध्ये तल्लीन होतात.याच आनंद उत्सवाचा भाग म्हणून मुक्काम पोस्ट तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथील भाविक संत सांप्रदायातील शिष्य संदीप बुधावले व तरड गावातील भाविक सालाबादप्रमाणे माऊलींच्या पालखीचे आयोजन करत असतात.तरड गावातील अबाल वृद्ध या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात पालखीचे प्रस्थान करून विठुरायाच्या नामघोषात पंढरपूर कडे विठू माऊलींच्या दर्शनासाठी निघतात राम कृष्ण हरी

0 0 1 8 1 7

5/5 - (1 vote)

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे