Breaking
ब्रेकिंग

राज्य माहिती आयोगात गेल्या दोन वर्षापासून आयुक्तांची पदे रिक्त असून,त्यावर प्रतिनियुक्तीचा उतारा शासनाने शोधला असला तरी मुख्य माहिती आयुक्त पद अद्याप भरता आलेले नाही.त्यासाठी जाहिरात दिल्यानंतर एकही पात्र उमेदवार मिळू शकत नाही असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले.

माहिती आयोगात पदे रिक्त असल्याने आरटीआय अंतर्गत दाखल झालेले द्वितीय अपील मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहत असून त्याबाबत सुज्ञ नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सरकारने फेब्रुवारी 2024 पर्यंत माहिती अधिक त्यांची पदे भरण्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते.त्यानंतर मकरंद रानडे,डॉक्टर प्रदीप व्यास,शेखर चेन्न यांना राज्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली,परंतु राज्याचे मुख्य माहिती आयुक्त पद अद्यापही रिक्त आहे याबाबत सरकारने जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले होते परंतु आलेल्या अर्जापैकी एकही उमेदवार निकषानुसार पात्र आढळला नाही असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने एक ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले.सरकारने आता पदे भरण्यासाठी आचारसंहितेची अडचण सांगितली असून मात्र या पदांना आचार संहितेची अडचण नसते.सरकारची एकंदर भूमिका पाहता त्यांना माहिती अधिकार कायदाच निषप्रभ करायचा आहे की काय हे प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.राज्यात मुख्य माहिती आयुक्त पदासाठी एकही लायक माणूस सापडत नाही ही बाब अविश्वासनीय असून त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांचा समावेश असलेल्या निवड समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.माहिती आयुक्तांची नेमणूक राज्यपालांकडून केली जाते मात्र आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्रीसदस्य समिती राज्यपालांना शिफारस करते.या समितीकडे येणाऱ्या अर्जांची छाननी करण्यासाठी आणखी एक शोध समिती असते त्यामध्ये निवृत्त न्यायाधीश,केंद्रीय माहिती आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव यांचा या शोध समिती समावेश असतो.परंतु यावेळी शोध समितीने छाननी करून दिलेल्या नावांपैकी एकही उमेदवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांच्या समितीने पात्र ठरविला नसल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात देण्यात आले आहे. भारतासारखा संविधानिक देशांमध्ये माहिती अधिकार लागू करण्यासाठी सन्माननीय अण्णा हजारे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून माहिती अधिकार कायदा अमलात आला, परंतु माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली होतानाचे चित्र वारंवार आपणाला सर्वांना दिसत आहे. मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज 18 क्राईम टाइम्स वृत्तवाहिनी मुंबई. ????डिजिटल युगाचे डिजिटल बातमीपत्र????

0 0 1 8 1 7

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे