Breaking
महाराष्ट्र

भारताची खाद्य संस्कृती जपण्यासाठी गणेश उत्सवाच्या आगमनाचे औचित्य साधून सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालय हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे केला अजित मोदक महोत्सव.

मोदक उत्सव म्हणजे नक्की काय तर आपल्या देशाशी संस्कृती नैवेद्य रूपाने अर्पित करणे.मोदक महोत्सव ही परिकल्पना हॉटेल मॅनेजमेंट यांनी राबवणे म्हणजे हल्लीच्या संस्कृतीमध्ये मोदकाची आवड आणि गोडी चाखणे.या सर्व गोष्टींची कारण मीमनसां केली असता पिझ्झा,बर्गर, चायनीज फूड आणि त्याच्यामध्ये वापरणार अजिना मोटो हा घातक पदार्थ समोर आल्याशिवाय राहत नाही.अजिना मोटो मनुष्याच्या बॉडी मध्ये गेल्यानंतर त्याचे दुष्परिणाम त्याची परिकल्पना येऊ शकत नाही.परंतु मोदकाच्या रूपाने आत्म्यामध्ये विलीन असणारे पंचधातू म्हणजे काय याचे कोडे नूडल्स मोमोज चायनीज खाणाऱ्यांना पडणार देखील नाही.आणि भारतीय संस्कृतीचे जवळजवळ जणू काही विस्मरण होताना एखादे कॉलेज आणि संस्था मोदक महोत्सव भरवत आहे ही परिकल्पना फास्ट फूड खाणाऱ्यांच्या अंगी पचणारी नाही.भारतीय खाद्य संस्कृती खूप बलाढ्य अशी संस्कृती त्यामध्ये विभन्नता नक्कीच आढळेल परंतु चव तितकीच तोला मोलाची विदर्भामध्ये वांग्याचे भरत..कोकणामध्ये हुलग्याची पिठी...घाटावरची तीच शेंगोळी..परंतु ज्याप्रमाणे तालुका जिल्हा आणि राज्य याचे विलगीकरण होत असताना जे काही पदार्थ आपल्या अवीट गोडीने प्रेमाने उच्चस्त पदावर विराजमान झाले आहेत त्यातील एक पदार्थ म्हणजे मोदक! मोदकाचा आकार म्हणजे लंबोदर. ज्याप्रमाणे गणपती बाप्पाला आकार आणि उकार आहे त्याचबरोबर उदर देखील आहे त्या उदराचा आकार घेऊन मोदकाचा जन्म झाला असे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही ज्या मोदकाने विघ्नहर्ताची भूक भागवली तो मोदक म्हणजे भारताची खाद्य संस्कृती.ही संस्कृती टिकवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड हॉटेल मॅनेजमेंट विभाग मोदक महोत्सव भरवत म्हणजे या संस्कृतीला कुठेतरी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सदरहू कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाने दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी मोदक महोत्सव आयोजित केला या कार्यक्रमाचे उद्घाटन कॉलेजचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख प्राचार्य जगताप सर यांच्या शुभ हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान उप प्राचार्य नेताजी सूर्यवंशी यांनी भूषवले याप्रसंगी हॉटेल मॅनेजमेंट विभागामार्फत पदवी व पदवीच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवासाठी विविध प्रकारचे मोदक तयार करून महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख व्हावी तथा आधुनिकतेबरोबर पारंपरिक सणांची देखील जोपासना व्हावी म्हणून साठी 2018 पासून सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रतिवर्षी प्रयत्न करत असते याप्रसंगी उपप्राचार्य प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच हा कार्यक्रम महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख डॉक्टर संदीप महामुनी, सौ सीमा मॅडम श्री गणेश पाटील श्री वैभव जगताप यांनी मोठ्या आनंदाने आपले योगदान दिले.मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज 18 क्राईम टाइम्स वृत्तवाहिनी.

0 0 1 8 1 7

5/5 - (1 vote)

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे