Breaking
ब्रेकिंग

अंबरनाथ, बदलापूर, नेरळवरून नरिमन-पॉईंट, फोर्ट 40 मिनिटात!! पनवेल, तळोजा, कल्याण, भिवंडी येथील वाहतूककोंडी संपणार.

अंबरनाथ, बदलापूर, नेरळवरून नरिमन-पॉईंट, फोर्ट 40 मिनिटात!! पनवेल, तळोजा, कल्याण, भिवंडी येथील वाहतूककोंडी संपणार. वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करणाऱ्या बडोदा-JNPT महामार्गावरील महत्त्वाचा भाग असलेला माथेरान येथील बदलापूर ते पनवेल असा सव्वा चार किलोमीटर अंतराचा बोगदा हा राज्यातील सर्वात लांब भुयारी मार्ग ठरणार आहे. हा बोगदा अवघ्या 15 महिन्यांत पूर्ण करण्यात आला आहे! या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटांमध्ये करणे शक्य होईल! बदलापूर-पनवेल थेट जोडले गेल्याने अटल सेतूमार्गे अंबरनाथ, बदलापूरकरांना 40 मिनिटांत मुंबई गाठणे शक्य होईल. या महामार्गावर बदलापूर ते पनवेल प्रवासासाठी दोन बोगदे उभारण्यात आले आहेत. यापैकी एक बोगदा 100% पूर्ण झाला असून दुसर्‍या बोगद्याच्या आतील भागात प्लॅस्टरिंगचे काम सुरु आहे. हे कामही ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. या महामार्गावर कल्याण, बदलापूर व इतर ठिकाणी जाण्यासाठी इंटरचेंज असतील. मुंबई, मुंबई-अहमदाबाद महामार्ग, वाढवण बंदर, जेएनपीटी बंदर, समृद्धी महामार्ग, मुंबई-बेंगळुरू, मुंबई-एरनाकुलम (गोवा हायवे) ही सर्व ठिकाणे आता बदलापूर, अंबरनाथ, नेरळ येथील लोकांसाठी 10 मिनिट ते 45 मिनिटांवर येत आहेत, तर नवी मुंबई येथील मुंबईचा T-3 एयरपोर्ट फक्त 25 मिनिटांवर येत आहे. डबल-इंजिन सरकारचे धन्यवाद आणि यातून ज्या लाखो लाभार्थ्यांचे कल्याण होणार आहे त्यांचे अभिनंदन! मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज 18 क्राइम टाइम्स नवी मुंबई.

0 0 1 8 1 7

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 Crime Times

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे